Skip to main content
निसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद
ताडोबा-अंधारी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात कागद, पेन आणि खर्डा या पारंपरिक साधनाद्वारेच शुक्रवारपासून व्याघ्र गणना केली जात आहे़ त्यामुळे विद्यमान पद्धतीच्या विश्वार्हतेवरच प्रश्नचिन्ह लावले जात आहे़.
चंद्रपूर : चौथ्या राष्ट्रीय व्याघ्र गणनेसाठी यंदा वाघाच्या अधिवास क्षेत्रापेक्षा संरक्षित क्षेत्रावर अधिक भर देण्याचे धोरण डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राबविले जात आहे. मात्र, व्याघ्र गणनेसाठी उपयुक्त असलेली आधुनिक जीपीएस यंत्रणा राज्यातील वनपाल व वनरक्षकांनी बहिष्काराचे शस्त्र उपसून शासनाला परत केली. रेखांकित छेदरेषा म्हणजे ‘ट्रॉन्झिट लाईन’या मूलभूत संकल्पनेवर आधारीत व्याघ्र गणनेला कर्मचाऱ्यांच्या बहिष्कारामुळे तडा गेला़ तर, दुसरीकडे ताडोबा-अंधारी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात कागद, पेन आणि खर्डा या पारंपरिक साधनाद्वारेच शुक्रवारपासून व्याघ्र गणना केली जात आहे़
Comments
Post a Comment